Gauri Khedekar Case : ये गौरे माझ्याशी का भांडलीस? बेंगळुरुला आल्याचा एवढा राग? राकेशच्या रात्रभर 'बॉडी'शी गप्पा; कुकरमध्ये...

Bengaluru Women Murder Case : बेंगळुरुमध्ये पत्नीची हत्या केल्यानंतर राकेश रात्रभ गौरीच्या मृतदेहाजवळ बसून तिच्याशी गप्पा मारत बसला होता. तो तिला सतत प्रश्न विचारत असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
gauri khedekar  Killed case husband rakesh khedekar
gauri khedekar Killed case husband rakesh khedekarSaam TV News
Published On

पुणे : राकेश राजेंद्र खेडेकर (वय ३६) याने आपल्या ३२ वर्षीय पत्नी गौरी अनिल सांबरेकर हिची २६ मार्चला रात्री बेंगळुरुत हत्या केली. हत्येनंतर तो तिच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून बोलत होता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला गुरुवारी संध्याकाळी उशिरा सातारा येथून अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे. राकेश पत्नीच्या हत्येनंतर पूर्ण रात्र तिच्या मृतदेहाजवळ बसला असल्याचं त्याने सांगितलं आहे.

राकेशने पोलिसांना सांगितलं की, जेवणाच्या आधी त्याचे आणि गौरीचे तिच्या नोकरीवरून भांडण झालं होतं. राकेश एका महिन्यापूर्वी महाराष्ट्रातून बेंगळुरुला शिफ्ट झाला होता. तो हिताची सिस्टम्स इंडियामध्ये वरिष्ठ प्रकल्प समन्वयक म्हणून काम करत होता. मात्र, तो वर्क फ्रॉम होम करत होता. गौरीने बेंगळुरुला येण्यापूर्वी महाराष्ट्रातील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती. बेंगळुरुमध्ये आल्यानंतर तिने नोकरीसाठी अर्ज केले, पण तिला चांगली नोकरी मिळत नव्हती. गौरी तिच्या बेरोजगारीसाठी राकेशला जबाबदार धरत होती. त्यामुळे ती सतत महाराष्ट्रात परत जाण्याचा आग्रह करत होती, असं राकेशने पोलिसांना सांगितलं. याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असे.

gauri khedekar  Killed case husband rakesh khedekar
बेंगळुरु-सातारा रस्त्यावर झुरळ मारण्याचं औषध पिऊन बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेलं...; राकेशचा रक्तरंजित प्रवास

घटनेच्या रात्रीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे आपला रागावर ताबा राहिला नाही आणि त्याने तिला कानशिलात लगावली. त्यानंतर तिने किचनमधील चाकू उचलून माझ्यावर फेकला, असं राकेश म्हणाला. यात राकेश किरकोळ जखमी झाला. त्यामुळे रागाच्या भरात राकेशने तिच्या मानेवर अनेक वार केले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

गौरीचा मृत्यू झाल्यानंतर राकेश रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून बोलत होता. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो तिला सतत प्रश्न विचारत होता की, ती त्याच्याशी का भांडली? तिने तिच्या बेरोजगारीसाठी त्याला का जबाबदार धरलं? आणि तिला बेंगळुरुला आल्याचा इतका राग का होता? दुसऱ्या दिवशी सकाळी राकेशने गौरीचा मृतदेहाचे तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस बाथरुममध्ये ठेवली. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने हे का केले हे त्याला माहिती नाही.

gauri khedekar  Killed case husband rakesh khedekar
२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, २ महिन्यापूर्वी बेंगळुरुला शिफ्ट, २ दिवसांपूर्वी भांडण; अन् वैवाहिक जीवनाचा भयानक अंत

दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास त्याने घराला कुलूप लावले आणि त्याची होंडा सिटी कारने तो पुण्याकडे फरार झाला. संध्याकाळी ५:१५च्या दरम्यान त्याने तळमजल्यावर राहणाऱ्या एका भाडेकरुला फोन केला आणि सांगितलं की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. काही वेळाने त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने घरमालकालाही याबाबत माहिती दिली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना याबाबत सांगितलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेशच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं.

गौरीने रात्रीच्या जेवणासाठी भात-कुर्मा बनवला होता. पण भांडण आणि तिच्या मृत्यूनंतर राकेशने जेवण केलं नाही. पोलीस हत्येच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा कुकरमध्ये भात तसाच होता. त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने घर सोडण्यापूर्वी काहीही खाल्ले नव्हते. आत्मसमर्पण करण्यापूर्वी राकेशने फिनायल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला वेळेत शोधून काढले आणि त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या तो धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

gauri khedekar  Killed case husband rakesh khedekar
तीनवेळा चाकू खुपसला, शांत डोक्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरले; बेंगळुरुच्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com