मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोरोना नियमांची युवासेनेकडून पायमल्ली! संदीप नागरे
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोरोना नियमांची युवासेनेकडून पायमल्ली!

सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्यास पाचशे रुपयांचा दंड लावण्यात आकारण्यात येतो. मात्र, या नियमातून नेते व कार्यकर्त्यांना सूट देण्यात आलीय का? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंट ने उच्छाद माजवायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरियंटपासून संपूर्ण जगाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, राज्यभर शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी ही अनावश्यक गर्दी टाळत, तोंडाला मास्क लावावे, सामाजिक अंतर राखावे तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अश्या सूचना दिल्या आहेत.

हे देखील पहा :

कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र, उध्दव ठाकरे यांच्या आदेशाला त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवत ठाकरे सरकारची कोरोना नियमावली धाब्यावर बसवली आहे. युवा सेनेचे नेते सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत आज हिंगोलीत युवा सेना पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

हिंगोलीच्या शासकीय विश्रामग्रहाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला युवासेनेचे कार्यकारणी सदस्य सिद्धेश कदम, शिवसेना आमदार संतोष बांगर, अभिषेक शिर्के यांच्यासह अनेक मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. तर व्यासपीठासमोर शेकडोंच्या संख्येने युवा सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात एकाही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता. सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्यास पाचशे रुपयांचा दंड लावण्यात आकारण्यात येतो. मात्र, या नियमातून नेते व कार्यकर्त्यांना सूट देण्यात आलीय का असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. या सर्वांवर प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT