Hingoli SRPF Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli SRPF: हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात कोरोनाची एन्ट्री, 57 जवान पॉझिटीव्ह

हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री केली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री केली आहे. यवतमाळच्या पुसद शहरात कर्तव्य बजावून परतलेल्या 57 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे (Hingoli SRPF 57 Javan Infected By Corona).

गेल्या काही दिवसांपासून हिंगोली (Hingoli) राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) हे जवान बंदोबस्त कामी यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, यातील अनेक जवानांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने राज्य राखीव पोलीस दलाने बंदोबस्त करुन माघारी परतलेल्या या 196 जवानांची कोरोना टेस्ट (Corona Test) केली. ज्यात तब्बल 57 जवान बाधित आल्याची माहिती हिंगोलीच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, या जवानांना सध्या हिंगोलीच्या शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस दलातून हद्दपार झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने जवानांच्या कुटुंबीयांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा- विनायक राऊत

मोठी बातमी! पुण्यातील १५२ महसूल अधिकाऱ्यांवर थेट कारवाई, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Pune Travel : पुणे फिरून थकलात? 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती, टेकडीवरून दिसतो शहराचा सुंदर नजारा

Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना, ३ दिवसांत ३०० कोटीपार कमाई

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT