Corona Rule: कोरोना नियमांचे उल्लंघन; दीड हजार नागरिकांवर कारवाई, तीन लाखावर दंड वसूल

कोरोना नियमांचे उल्लंघन; दीड हजार नागरिकांवर कारवाई, तीन लाखावर दंड वसूल
Corona Rule
Corona Rulesaam tv
Published On

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोजची रूग्ण संख्या वाढत असताना पोलिस व प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही दुर्लक्ष करून हेकेखोरपणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ४६५ नागरिकांवर पोलिसांनी (Police) कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख ९६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५६ आस्थापनाधारकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. (nandurbar news Violation of corona rules Action taken against one and half thousand citizens)

Corona Rule
हृदयद्रावक..बाळाचा चेहरा बघण्याआधीच आईचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) उद्रेक लक्षात घेता पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी पोलिस ठाणे प्रमुखांना विनामास्क नागरिकांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाधारकांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ ते २१ जानेवारी दरम्यान आठवडाभर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी, फिक्स पॉइंट लावून वाहनांची तपासणी व नियमांचे उल्लंघन (Corona Rules Break) करणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिस ठाणेनिहाय कारवाई संख्या (कंसात) व दंड वसुलीची रक्कम अशी : नंदुरबार शहर-(२८८) -५७ हजार ४००, नंदुरबार तालुका - (५०) १० हजार, उपनगर-(६०) १२ हजार, नवापूर- (१७४)-३४ हजार ८००, विसरवाडी-(८७)-१७ हजार ४००, शहादा-(२१०)-४२ हजार, सारंगखेडा-(१४२)-२८ हजार ४००, म्हसावद-(११७)-२३ हजार ४००, धडगाव-(५८)-११ हजार ६००, अक्कलकुवा-(९५) २२ हजार ६००, तळोदा-(९५)-१ हजार ९००, मोलगी- (३५) -७ हजार, नंदुरबार (Nandurbar) शहर वाहतूक शाखा -(५४) १० हजार ८०० अशी एकूण १४६४ जणांवर कारवाई करून दोन लाख ९६ हजार चारशे रुपये दंड वसूल केला आहे.

तसेच याच दरम्यान, रेस्टॉरंट, उपहारगृह व इतर आस्थापनांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक क्षमता आढळल्याने त्यांच्यावरही कारवाई केली. त्यात तालुकानिहाय दाखल गुन्हे असे : नंदुरबार शहर-७, नंदुरबार तालुका-२, उपनगर-१, नवापूर-६, विसरवाडी-६, शहादा-९, सारंगखेडा-५, म्हसावद-५, धडगाव-१, अक्कलकुवा-४, तळोदा-५, मोलगी-१ असे ५२ नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आगामी काळातही ही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी कोरोना गांभीर्याने घ्यावा, जनहितासाठीच कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com