नवी दिल्ली - कोरोना (Corona) बाधितांची आटोक्यात आलेल्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या प्रकरणांसोबत देशात ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात (Maharashtra ) कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 525 जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 2,59,168 जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 21,87,205 झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.78 टक्के इतका झाला आहे. (India Corona Latest News Update)
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
राज्यात गेल्या 24 तासात 46,393 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 74,66,420 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 30,795 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 70,40,618 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.गेल्या 24 तासात 48 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. आतापर्यंत 1,42,071 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,79,930 रुग्ण अॅक्टीव आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 21 लाख 86 हजार 124 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 3382 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती
गेल्या 24 तासात राज्यात 416 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 2,759 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1,225 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.