Hingoli Soldier News  
महाराष्ट्र

Hingoli News: हिंगोलीच्या भूमिपुत्राला सिक्कीम राज्यात वीरमरण

Hingoli News : अंकुश वाहुळकर असे सैन्य दलातील जवानाचे नाव आहे. वाहुळकर हे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावचे रहिवासी होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे, साम प्रतिनिधी

हिंगोली: हिंगोलीच्या भूमिपुत्रांला सिक्कीम राज्यात कर्तव्य बजावताना एका दुर्घटनेत वीरमरण आले आहे. अंकुश वाहुळकर असे सैन्य दलातील जवानाचे नाव आहे. वाहुळकर हे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावचे रहिवासी होते. अंकुश वाहुळकर २०२० साली महार बटालियनमध्ये अंकुश हे रूजू झाले होते. दरम्यान या घटनेनंतर जवान अंकुश वाहुळकर यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

सिक्कीममध्ये मृत्यू झालेल्या हिंगोलीच्या जवानाचे मृतदेह उद्या कुटुंबाच्या ताब्यात देणार येणार आहे. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सोडून कर्तव्याला प्राधान्य देत जवान कर्तव्यावर परतला होता. सिक्कीम राज्यात सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावच्या अंकुश वाहुळकर या जवानाचं अपघाती दुःखद निधन झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने वाहुळकर यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना कळविली.

वाहुळकर यांचा मृतदेह सिक्कीम येथून हैदराबादमध्ये आणण्यात येणार असून त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जवानाचे मूळ गाव असलेल्या गुंज येथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी घेऊन येणार आहेत.

उद्या दुपारनंतर शासकीय इतमामात सैन्य दलातील जवान अंकुश वाहुळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे. दरम्यान २०२१ साली भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या वाहुळकर यांनी नेहमी कर्तव्याला प्राधान्य दिलं पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आलेल्या वाहुळकर यांच्या विवाहासाठी नातेवाईक प्रयत्न करत असताना अचानक वरिष्ठांचे कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाल्यानंतर वाहुळकर हे रुजू झाले होते. या घटनेमुळे जवानाच्या कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरलीय.

३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काही दिवसापूर्वी भारताच्या सेवेसाठी लेह-लडाखमध्ये भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या ३० वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरेश हुकलाल नागपुरे असं मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. सुरेश नागपुरे हे लेह-लडाखमधील शून्याखाली गेलेल्या तापमानात सेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धानोरे येथील भारतीय सैन्य दलातील जवानाचाही अपघात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. श्रीराम राजेंद्र गुजर या जवानाचा शिर्डी येथून दुचाकीवरुन परत येत असताना अपघाती मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Stock Exchange : स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवण्याची धमकी, बिल्डिंगमध्ये ४ RDX बॉम्ब ठेवल्याचा ई मेल, पोलीस अलर्ट मोडवर

Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT