Chhagan Bhujbal News Saamtv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: मोठी बातमी! ओबीसी सभेला जाताना छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे

Hingoli OBC Mahasabha Update: हिंगोलीतील रामलिला मैदानावर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महासभा होणार आहे. या सभेला जाताना भुजबळांचा ताफा अडवण्यात आला असून ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड, ता. २६, नोव्हेंबर २०२३

Hingoli Breaking News:

हिंगोलीतील रामलिला मैदानावर ओबीसी महासभा होणार आहे. या सभेला मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळत असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोलीकडे जाताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला असून ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात हिंगोलीमध्ये ओबीसी महासभा होत आहे. हिंगोलीच्या रामलिला मैदानावर ही सभा होणार असून सभेला जाताना छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नांदेडच्या (Nanded) आर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या तरुणांकडून भुजबळांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवले. पोलिसांनी या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून नांदेड विमानतळ तसेच या सभेच्या ठिकाणीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जालन्यातील (Jalana) अंबडमध्ये ओबीसी नेत्यांच्या पहिल्या सभेतून छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. ज्यानंतर भुजबळ आणि जरांगे असा वाद पाहायला मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर भुजबळांच्या आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Refund: आयटीआर फाइल केलाय, पण अजूनही रिफंड आला नाही? ही कारणे असू शकतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: पुण्यातील इंडिगोची आज दिवसभरातील ४२ विमान उड्डाण रद्द

Satara Travel : साताऱ्यात डोंगर माथ्यावर लपलाय ऐतिहासिक किल्ला, 'येथे' मित्रांसोबत ट्रेकिंगची येईल मजा

Rinku Rajguru : १६व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण; आर्चीनं मिस केलं कॉलेज लाइफ, रिंकू राजगुरूनं सांगितल्या आठवणी

Mahaparinirvan Din: बाबासाहेब आंबेडकरांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन, महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला| VIDEO

SCROLL FOR NEXT