रेल्वेचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित प्रवास मानला जातो. म्हणूनच लाखो लोक रेल्वेतून रोज प्रवास करत असतात. मात्र ट्रेनचा लोको पायलट दारुच्या नशेत तर नाही याची तपासणी करण्याची यंत्रणादेखील रेल्वेकडे आहे. लोको पायलटला ट्रेनच्या ड्रायव्हिंग सीटवर जाण्याआधी ब्रेथ अॅनालायजर टेस्टमधून जावं लागतं. जेणेकरुन लोको पायलट दारुच्या नशेत आहे की नाही हे स्पष्ट होईल.
मात्र मागील पाच वर्षांत रेल्वेच्या तीन झोनमधील किमान ९९५ रेल्वे लोको पायलट या टेस्टमध्ये नापास झाले आहेत. यापैकी एक तृतीयांश लोको पायलट ड्युटी संपल्यानंतर या टेस्टमध्ये नापास झाले आहेत. म्हणजे दारूच्या नशेत त्यांनी गाडी चालवली, अशी माहिती RTIमधून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिल्ली झोनमध्ये ४८१ लोको पायलट दारुच्या नशेत आढळले आहेत. यातील १८९ लोको पायलट ट्रेनमधून उतरल्यानंतर घेतल्या गेलेल्या टेस्टमध्ये फेल झाले आहेत. गुजरातमध्येही १०४ लोको पायलट या टेस्टमध्ये फेल झाले आहे. मुंबई विभागाचा विचार केला तर परिस्थिती बरी आहे. कारण मुंबई विभागात केवळ ११ लोको पायलय यामध्ये फेल झाले आहेत. (Latest Marathi News)
मध्य प्रदेशमधील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी याबाबत माहिती मागवली होती. यानुसार रेल्वेच्या वेस्टर्न, नार्दर्न आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे झोनची ही माहिती आहे. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत पकडलेल्या लोको पायलटवर कारवाई केली जाते. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने 2012 मध्ये सर्व मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवले होते. यानुसार, जर लोको पायलटमध्ये 1 ते 20 mg/100 ml अल्कोहोलची पातळी आढळून आली, तर त्याला ड्युटीवरून काढून टाकण्यात येते. ज्यामध्ये पातळी 20 mg/100 ml पेक्षा जास्त असल्याचे आढळल्यास लोको पायलटला सेवेतून काढून टाकण्याची तरतूद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.