Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : व्हाट्सअपवर लग्न आमंत्रणाची एपीके फाईल; ओपन करताच खात्यातील रक्कम लंपास

Hingoli News : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या शक्कल लढवत अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार लग्न आमंत्रणाची पत्रिका पाठवून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला

संदीप नागरे

हिंगोली : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया अवलंबिल्या जातात. एखादी लिंक पाठवून त्या ओपन केल्यानंतर चुना लावला जात असतो. आता याच्या पुढे जात एपीके फाईलचा माध्यमातून खात्यातील रक्कम लंपास केल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याला लग्नाच्या आमंत्रणाची फाईल पाठवून फसवणूक करण्यात आली. 

हिंगोलीत सायबर गुन्हेगाराने जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या खात्यातील पैसे लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता सोमेश्वर गीते यांच्या व्हाट्सअपवर एपीके नावांची फाईल समोरच्याने पाठविली होती. यामध्ये वेडिंग invitation card असा मजकूर होता. फाईल पाठविण्यासोबत वेलकम शादी मे जरूर आये असे देखील लिहिले होते. 

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान ही फाईल अनेकांच्या व्हाट्सअप वर आपोआप शेअर झाली. त्यानंतर थेट खात्यामधून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर झाल्याचे संदेश प्राप्त झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयातील समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी मधुकर राऊत यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली असून एक लाख ९१ हजार रुपये लंपास झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

सायबर पोलिसांकडून आवाहन 

या एपीके फाईलचा माध्यमातून हिंगोलीच्या बांधकाम विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे पैसे देखील खात्यामधून गायब झाले आहेत. या सायबर क्राईमनंतर हिंगोली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना केल्या असून अशा प्रकारच्या लिंक ओपन न करता सायबर सेलकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT