Wasmat Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Wasmat Bajar Samiti : हळद विक्रीचे दोन महिने उलटूनही पैसे मिळेना; शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने बाजार समिती बंद

Hingoli News : बाजार समिती मार्फत अडत व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांनी मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या ६० दिवसांपासून पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे रोखल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत

संदीप नागरे

हिंगोली : शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळणे अपेक्षित असते. मात्र हिंगोलीच्या वसमत बाजार समितीमध्ये हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रक्कम मिळत नसल्याने बाजार समितीतील खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. याला साधारण दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तर या शेतकऱ्यांना अडत व्यापाऱ्याकडून पैसे मिळत नसल्याने हळद विक्री केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत.  बाजार समिती मार्फत अडत व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांनी मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या ६० दिवसांपासून पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे रोखल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत.  

१९ जुलैपासून मालाची खरेदी बंद 

दरम्यान या सगळ्या आर्थिक अडचणीमुळे अडत व्यापाऱ्यांनी १९ तारखेपासून आपली दुकाने बंद ठेवली असून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराकडे मात्र वसमतमधील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे देखील पाहायला मिळालं आहे. काबाड कष्ट करून उत्पादन केलेल्या मालाचे पैसे मिळण्यास उशीर होण्याला नेमके जबाबदार कोण? असा सवाल करत वसमत मधील अनेक शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

व्यवहार ठप्प 

दरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची खरेदी केली जात असते. मात्र १९ जुलैपासून बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे मागील सहा दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले आहेत. तर माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आपला माल परत घेऊन जावे लागत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT