Eknath Khadse : हिंमत असेल तर तुमच्या संपत्तीची चौकशी करा; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

Jalgaon News : गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधील आरोप प्रत्यारोप अजूनही कमी होताना दिसत नाही. याच दरम्यान आज पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
Eknath Khadse Girish mahajan
Eknath Khadse Girish mahajanSaam tv
Published On

जळगाव : आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या संपत्तीची आतापर्यंत पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे. यामुळे माझ्या काय चौकशा करायच्या त्या करा, पण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करावी; अशा शब्दात आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मधील आरोप प्रत्यारोप अजूनही काही केल्या कमी होताना दिसत नाही. याच दरम्यान आज पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी? मंत्री गिरीश महाजन यांचा व्यवसाय आहे तरी काय? असा सवाल ही खडसे यांनी उपस्थित केला आहे.

Eknath Khadse Girish mahajan
Jalgaon Crime : जळगावमध्ये जोरदार राडा; दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण

तोपर्यंतच महाजनांना किंमत 

जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे; तोपर्यंत गिरीश महाजन यांना किंमत आहे. एकदाचा देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी १०० कुत्रे लागतात तशी याची हालत होणार असल्याचे देखील खडसे म्हणाले. तसेच आता जर हिम्मत असेल, खऱ्या अर्थाने पत वरच्या बाजूला असेल तर माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी करण्याचे थेट आव्हान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले आहे. 

Eknath Khadse Girish mahajan
Akola : संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला महिलेकडून चोप; छेडखानी केल्याचा आरोप, पक्षातून हकालपट्टी

पुरावे हस्तगत करण्यासाठी लोढांना विविध गुन्ह्यांत अडकविले 

हनी ट्रॅपमध्ये अटक केलेल्या प्रफुल लोढा याची घटनेनंतर पंधरा दिवसानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात कशी नोंद झाली? घटना घडली ती तारीख आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ती तारीख यामध्ये १५ दिवसांचा फरक आहे. पंधरा दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले? असा सवाल कटर प्रफुल्ल लोढा याच्याकडून काही मिळण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते नष्ट करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com