Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : शुल्लक कारणातून व्यापाऱ्याला दोघांची मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Hingoli News : १७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणात बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीत एका क्रेशर मशीन चालवणाऱ्या व्यापाऱ्याला शुल्लक कारणावरून दोन जणांनी पेट्रोल पंपावर बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांडा, खुर्च्या आणि दगडांच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली असून यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. हि संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हिंगोली शहरातील एका पेट्रोल पंपावर सदरची घटना घडली आहे. यात काळुराम जाधव असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर शंकर देवकर व दिगंबर देवकर अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत व्यापारी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सद्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मारहाण नेमकी कोणत्या कारणातून झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

गुन्हा दाखल मात्र मारेकरीना अद्याप अटक नाही 

धक्कादायक म्हणजे ही घटना १७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणात बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याने व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी आता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

गाडीला कट मारल्याच्या कारणातून हाणामारी 
बीड : बीड शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तरुणांच्या दोन गटात राडा झाला. गाडीला कट लागल्याच्या कारणातून या दोन गटात मारामाऱ्या झाल्या. बराच वेळ हा सगळा प्रकार सुरू होता. यामध्ये एक जण जखमी देखील झाला. यानंतर परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी दाखल होत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्या तक्रारीवरून दोन्ही गटातील तरुणांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT