Ahilyanagar : पाच डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही अटक नाही; ठाकरे गट आक्रमक

Ahilyanagar News : मृत्यूनंतर शरिरातील अवयवांची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : खोटे रिपोर्ट तयार करून रुग्णांवर चुकीचे उपचार करणे. यामुळे रुग्णाचा मृत झाल्यानंतर रुग्णांचे अवयव तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शहरातील नामांकित पाच डॉक्टरांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या डॉक्टरांना अद्याप अटक करण्यात आली नसून या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.    

कोरोना काळात घसा दुखत असल्याचा इलाज करण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्टबनविला होता. यानंतर सदर रुग्णावर पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. तर यानंतर मृतदेह मुलाला न देता जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यात अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली; अशा प्रकारचे गंभीर गुन्हे शहरातील पाच डॉक्टरांवर दाखल झाले आहेत. 

Ahilyanagar News
Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

कठोर कायदेशीर कारवाईची मागणी 

अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात रुग्णाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच डॉक्टरांनी विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र गुन्हे दाखल होऊ नये डॉक्टर अद्याप अटक झाले नसल्यामुळे अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून त्यांच्या रुग्णालयावर बॉम्बे नर्सिंग होम कायदा अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे

Ahilyanagar News
Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

पोलीस अधीक्षकांना निवेदन 

मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून इतका मोठा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर देखील संबंधित डॉक्टरांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही. या डॉक्टरांना लवकरात लवकर अटक करावी; अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com