Eknath Shinde Group's 12 MLA Will Return To Uddhav Thackeray Group Said Lawyer Asim Sarode Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दोन बडे नेते ठाकरेंची साथ सोडणार? शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा; नावेही सांगितली

Hingoli Politics News: लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये जाहीर सभा घेत आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता.

संदीप नागरे

Santosh Bangar News:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये जाहीर सभा घेत आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या या सभेला उत्तर देताना संतोष बांगर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आठ दिवसात शिंदे गटात येतील, असा मोठा दावा केला आहे.

काय म्हणालेत संतोष बांगर?

"माझ्या कळमनोरीची जनता आणि शिवसैनिक यांना संतोष बांगर काय आहे? हे माहित आहे. त्यामुळे त्यांनी कितीही जीव पणाला लावला तर काहीही फरक पडणार नाही. कालच्या सर्वेमध्येही संतोष बांगरला ५९ टक्के आणि उबाठा गटाचा कोणी उभा राहिला तर १८ टक्के मतं इतकी तफावत आहे. त्यामुळे संतोष बांगरच्या पाठीमागे जनता ठामपणे उभी आहे," असे संतोष बांगर म्हणाले.

तसेच "अंबादास दानवे (Ambadas Danve) हे माझे खास मित्र आहेत. अंबादास दानवे साहेब आठ दिवसात स्फोट उडवून टाकतील, आणि १०० टक्के आमच्यासोबत खांद्याला खांदा लाऊन काम करतील. असा दावाही त्यांनी केला. तसेच त्यांना लोकसभेची उमेदवारी आमच्याकडूनच मिळेल," अशीही परिस्थिती निर्माण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच "या दोन चार दिवसात काय काय होईल सांगता येत नाही. वैभव नाईक पण येतील. लोकांना ज्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा भंग करुन टाकल्या आहेत. जनतेला शिवसेना- भाजपचे काम आवडले. जनता अतिशय खूष आहे. महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला नाही, असेही संतोष बांगर यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

Couple Viral Video : पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्.... प्रेमीयुगुलांचे प्रेम उतू

Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT