Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : धावत्या ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांची हळद चोरी; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Hingoli News : हिंगोलीच्या वसमत शहरात दिवसाढवळ्या धावत्या ट्रॅक्टरमधून हळदीच्या कट्ट्याची चोरी करण्यात आली. मार्केटमध्ये गेल्यावर हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला

संदीप नागरे

हिंगोली : शेतकऱ्याने काढणी केलेली हळद मार्केटला विक्रीसाठी ट्रॅक्टरमधून नेली जात होती. मात्र ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये (Hingoli) कोणी नसल्याचे पाहून यावर चढून हळदीचे कट्टे उठविले जात होते. विशेष म्हणजे हि चोरी धावत्या ट्रॅक्टरमधून केली जात होती. या चोरीतील एकास (Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हिंगोलीच्या वसमत शहरात दिवसाढवळ्या धावत्या ट्रॅक्टरमधून (Turmeric) हळदीच्या कट्ट्याची चोरी करण्यात आली. मार्केटमध्ये गेल्यावर हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला. यानंतर (Farmer) शेतकऱ्याने वसमत पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे ही चोरी उघड केल्याची माहिती मिळाली आहे. या चोरीतील एकास ताब्यात घेतले आहे. 

चोरीची हळद जप्त 

हळद चोरी करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीला वसमत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अंकुश तिकासे असल्याचे पुढे आले असून पोलिसांनी आरोपीकडून शेतकऱ्याची चोरी केलेली हळद जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT