Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : तलाठ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करताना अडवणूक; खासदार आष्टीकर संतापले

Hingoli News : शेतकऱ्यांनी तलाठी नुकसानीचे पंचनामे सरसकट करत नसल्याचं सांगितले आहे. यावर तलाठ्यांनी सर्वच गटातील नुकसान झाल्याचे पंचनामे सादर करणार नाही. या संदर्भात वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले

संदीप नागरे

हिंगोली : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून प्रशासकीय स्तरावर पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करताना महसूल प्रशासनाच्या तलाठ्याकडून अडवणूक होत असल्याचा प्रकार बाळापुरमध्ये पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी हि व्यथा मांडल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर संतप्त झाले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन लाख ७५ हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तर २३७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पुराच्या महाप्रलयात आतापर्यंत १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांची सरसकट झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे सादर करत नसल्याचं पुढे आल आहे.

तलाठ्याला धरले धारेवर 

नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी नुकसानीचे पंचनामे सरसकट करत नसल्याचं सांगितले आहे. यावर तलाठ्यांनी सर्वच गटातील नुकसान झाल्याचे पंचनामे सादर करणार नाही. या संदर्भात वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संताप व्यक्त करत कळमनुरीचे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांना खडे बोल सुनावले आहे. तसेच गावगाड्यातील नुकसानीची योग्य माहिती गोळा करायला सांगा. सरकार नुकसानीचा अहवाल कसा स्वीकारत नाही? हे आम्ही पाहतो; असे म्हणत अष्टीकर यांनी तहसीलदारांना झापले आहे.

पत्नीचे दुःख बाजूला ठेवत खासदार आष्टीकर पूरग्रस्त भागात पोहचले
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्नीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार आष्टीकर काल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर डोंगरगाव, डोंगरकडा भागामध्ये पोहोचले होते. यावेळी शेतकऱ्यांचे पुरामुळे झालेले आतोनात नुकसान पाहून नागेश पाटील आष्टीकर यांनी सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Care: महागडे शॅम्पू कशाला? अळशीने केस होतील मजबूत, चमकदार अन् लांब

अभिषेक शर्माला मिळालेल्या SUV कारची किंमत किती?

Navratri Puja Rules: नवरात्रीत मासिक पाळी आली तर पूजा करावी का? शास्त्रानुसार नेमकं काय सांगतं?

भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग महाराष्ट्रात, कांजूरमार्ग ते बदलापूर प्रवास होणार सुसाट; प्रवाशांना दिलासा

Maharashtra Live News Update: कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT