Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : सागवान तस्कर वन विभागाच्या रडारवर; कळमनुरी परिसरातून मोठा साठा जप्त

Hingoli News : गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सागवान वृक्षाची तोडणी करून चोरट्या मार्गाने वाहतुक केली जात होती. वाहतूक करणाऱ्या या सागवान तस्करांवर वन विभागाचे देखील लक्ष होते. अशातच चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सागवान वृक्षाची तोडणी करून चोरट्या मार्गाने वाहतुक सुरू आहे. दरम्यान गोपनीय माहितीवरून सागवान तस्कराविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली असून कळमनुरी शहराच्या जवळ सागवान तस्करांनी जमा करून ठेवलेला मोठा साठा वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. 

सागवान वृक्षांची तोडणी करून त्याची वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र जंगल परिसरातून या सागवान वृक्षांची तोडणी करून त्याची चोरटी वाहतूक केली जाते. त्यानुसार हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सागवान वृक्षाची तोडणी करून चोरट्या मार्गाने वाहतुक केली जात होती. वाहतूक करणाऱ्या या सागवान तस्करांवर वन विभागाचे देखील लक्ष होते. अशातच चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. 

कारवाईत सापडला मोठा साठा 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात होत असलेल्या चोरट्या वाहतुकीबाबत वनविभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सागवान तस्करी विरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. यातच कळमनुरी शहराच्या जवळ सागवान तस्करांनी जमा करून ठेवलेला मोठा साठा वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाचे स्वतंत्र पथक आरोपीचा शोध घेत आहे. 

वन विभागाचे स्वतंत्र पथक 
दरम्यान कळमनुरी तालुक्यात झालेल्या कारवाईत सागवान तस्करांनी जमा करून ठेवलेला मोठा साठा वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून या पथकाकडून सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या व साठा करून ठेवणाऱ्यांचा शोध घेत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT