Fraud Marriage : लग्न लावण्याच्या नावाने ५ लाख उकळले; फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हा दाखल

Ahilyanagar news : अनेक दिवसांपासून बाबू म्हात्रे लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट भेटले. त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले
Fraud Marriage
Fraud MarriageSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: गेल्या वर्षभरात लग्नाळू तरुण हेरून त्यांची फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहे. तर पोलिसांनी आतापर्यंत अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. तरी सुद्धा अनेक लग्नाळू तरुण अश्या फसवणूक करणाऱ्यांचे बळी पडत आहे. असाच पुन्हा एक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला असून या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहिल्यानगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील अश्याच एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. लग्न करून देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले आहे. बाबू गोरख मत्रे (वय २८) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. बाबू मत्रे याच्या ओळखीचे लग्न लावून देणाऱ्या एजेंट बापू काटे आणि नाना कात्रजकर या दोघांनी फसवणूक केली. यात त्यांनी रक्कम देखील घेतली. 

Fraud Marriage
Sangli Police : सांगलीच्या एमडी ड्रग्जचे गुजरात, मुंबई कनेक्शन; तपासासाठी तीन पथक

जून मध्ये लावून दिले लग्न 

अनेक दिवसांपासून बाबू म्हात्रे लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर हे भेटले. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. त्यावेळी नवरदेव बाबू मत्रे याच्याकडून सर्व तयारी करण्यात आली. त्यानुसार आळंदी येथे बाबू मत्रे या तरुणाचे स्नेहा चव्हाण या मुलीसोबत १५ जून २०२४ रोजी लग्न लावून दिले.

Fraud Marriage
Kalyan : सुभाष मैदानात इनडोअर गेम स्टेडियमला विरोध; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान खेळाडूंसह मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने ठोकली धूम 

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलीने धूम ठोकली. दरम्यान बाबू मत्रे यांनी आपले लग्न लावून देण्यासाठी एजंट आणि मुलीकडच्या फसवणाऱ्या टोळीला एकूण ३ लाख ६० हजार तर दोन तोळे सोने दिले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खर्डा पोलीस ठाण्यात नवरी मुलगी आणि तिच्यासोबत आलेल्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन एजंट, मुली सोबत आलेले एक कलवरी, आणि लग्न जमवून देणारी महिला अश्या 5 जणांन विरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com