Hingoli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, बाजार समितीतही नुकसान

Hingoli News : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे, दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने हाहाकार माजविला असून यात मोठे नुकसान झाले आहे.

संदीप नागरे

हिंगोली : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यातच आज दुपारच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. जोरदार पावसामुळे काही वेळातच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणची रहदारी बंद झाली आहे. तर दुसरीकडे बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली हळद देखील भिजली असल्याने शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे. 

हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत हाहाकार माजविला आहे. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी तर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहायला सुरुवात वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे. यात प्रामुख्याने इंदिरा चौक, गांधी चौक परिसरात किरकोळ व्यापाऱ्यांचे साहित्य भिजले आहे. तर नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली. 

बाजार समितीत आणलेली हळद भिजली 

हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे. मार्केट कमिटीच्या यार्डा मधील पत्रे फुटल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीमध्ये पाणी शिरले आहे. तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची भिजलेली हळद योग्य भावाने खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र याच हिंगोली जिल्ह्यात बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा माल असुरक्षित झाला आहे. 

परभणीमध्ये पावसाच्या संततधारेला सुरुवात
परभणी जिल्ह्यात दोन दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारपासून परभणी शहरासह जिल्हाभरात पावसाच्या संततधारेला सुरुवात झाली होती. मात्र मागच्या एक तासापासून पावसाचा जोर वाढला आहे. परभणीसह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे खरीप पिकांना या पावसामुळे मोठा धोका निर्माण होणारा आहे.ज्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांच पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस आता काळवंडण्याची भीती

BJP Silent March: विरोधकांचा कट हाणून पाडा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरोधकांच्या मोर्चावर कडाडले, नेमकं काय म्हणाले?

Khakhra Chaat Recipe: कमी तेलात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा झटपट कुरकुरीत खाकरा चाट

Satyacha Morcha : आजचा मोर्चा रिकामटेकड्या कार्यकर्त्यांची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; अजित पवार गटाच्या आमदाराची टीका

Face Care: महागडे फेशियल न करताही तुमचा चेहरा दिसेल क्लीन आणि ग्लोईंग; फॉलो करा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT