Sambhajinagar : पाय घसरल्याने नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; नदीकाठी जनावरे चारताना दुर्दैवी घटना

Sambhajinagar News : गुरे नदी काठावर गेल्याने त्यांना तेथून दूर नेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरला आणि तो शिवना नदीत कोसळला, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बाहेर निघता न आल्याने युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : रोज जनावरे चरायला जाणाऱ्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जनावरे चारत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने तरुण बुडाल्याची घटना सनव शिवारातील शिवना नदी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन जवळ सनव येथील रहिवासी आकिब अनिश शेख (वय १८) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान आकिब शेख हा दररोज जनावरे चारण्यासाठी जात असायचा. त्यानुसार नेहमीप्रमाणे आकिब हा शिवना नदी परिसरात गुरे घेऊन गेला होता. नदी काठी गेला असताना जनावरांना हाकलण्यासाठी गेला असताना पाय घसरला. यात तोल जाऊन नदीत पडला. 

Sambhajinagar News
Jalna : बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध; जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दरम्यान नदीत पडल्यानंतर त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींनी नदी पात्रात उडी घेऊन अकिबचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. याबाबत माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलिम चाऊस यांनी व त्यांची टीम पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. 

Sambhajinagar News
Onion Price : कांद्याच्या दरात घसरण; ट्रॅक्टर प्रशासकीय कार्यालय आवारात नेत शेतकऱ्यांचे आंदोलन

कुटुंबीयांचा आक्रोश 

सलिम चाऊस यांनी संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकास पाचारण केले. तसेच एनडीआरएफचे जवानही दाखल झाले. त्यांनी अकीबचा नदीच्या पाण्यात शोध घेतला असता सायंकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर, गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह दाखल केला. आकिबच्या मृत्यूची बातमी समजताच आई- वडीलांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com