Hingoli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

Hingoli News : दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे हिंगोली शहरातील काही भागात पाणी साचले होते

संदीप नागरे

हिंगोली : हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारच्या सुमारास हिंगोलीत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरील पावसाचे पाणी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात साचल्याने पूर परिस्थिती सारखे चित्र निर्माण झाले होते. 

राज्यात परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. या आठवड्यात राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे हिंगोली शहरातील काही भागात पाणी साचले होते. 

वादळी वाऱ्याचा तडाखा 

पावसासोबत जोरदार वादळी वाऱ्याचा देखील तडाखा बसला आहे. यामुळे हिंगोली बस स्थानकाच्या परिसरात अशोक चव्हाण व मेघना बोर्डीकर यांच्या स्वागताचे पोस्टर्स वादळी वाऱ्याने कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. मात्र वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. तर शहरातील रस्त्यांवर देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

सांगलीसह जिल्ह्यात इतर भागात पाऊस
सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्यातील जतसह काही भागात पावसाने हजेरी लावली. शहरातील सकल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षनेतेपदाविनाच चालणार अधिवेशन?

फुगा फुटला, जीव गेला, मुलांच्या हातात फुगा बॉम्ब

Baba Adhav Death : सर्वसामान्यांचा आवाज हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन

japan earthquakes : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी थरथरला जपान; ७.६ रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा अ‍ॅलर्ट

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन,पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT