Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडलेले सोयाबीन; हिंगोली, सेनगाव तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक

Hingoli News : पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कनेरगाव परिसरात प्रचंड नुकसान झाले. तर कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सेनगाव तालुक्यात बळीराजा उध्वस्त झाला आहे. असे असताना देखील दोन्ही तालुके वगळण्यात आले

संदीप नागरे

हिंगोली : राज्य सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करत तीस हजार रुपये कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे. मात्र यामध्ये मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील दोन तालुके वगळले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून या विरोधात शिवसेना उबाठा कडून तहसील कार्यालयात आंदोलन करत सडलेले सोयाबीन तहसीलदारांच्या खुर्ची व टेबलावर फेकण्यात आले.  

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, कापूस खराब झाला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ३० हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र यातून काही जिल्हे व तालुके वगळण्यात आले असल्याने या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

हिंगोली व सेनगाव तालुका वगळला 

दरम्यान हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यातील सेनगाव व हिंगोली हे दोन तालुके वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम तहसील कार्यालयात फेकल्याचा प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन केले आहे. 

तहसीलदारांच्या टेबलावर टाकले सडलेले सोयाबीन 
ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सेनगावच्या तहसील कार्यालयात दाखल होत शेतकऱ्यांच्या शेतातील पावसामुळे सडलेले सोयाबीन चक्क तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले आहे. हिंगोलीत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कनेरगाव परिसरात प्रचंड नुकसान झाले. तर कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सेनगाव तालुक्यात बळीराजा उध्वस्त झाला आहे. अशी परिस्थिती असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमेन पोलिसांच्या ताब्यात

पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Khana Saree Dress: खणाच्या साडीपासून शिवा हे ७ ट्रेंडी ड्रेस उन्हाळ्यात लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी आहे बेस्ट चॉईस

Monsoon Update : आनंदवार्ता! 'या' तारखेला मान्सून केरळमध्ये होणार दाखल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT