Hingoli Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Vidhan Sabha : भाजपचे निम्मे कार्यकर्ते सोबत; हिंगोलीत अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक खुलासा

Hingoli News : हिंगोली विधानसभा मतदारसंघात रामदास पाटील सुमठाणकर यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे रामदास पाटील हे भाजपचे वरिष्ठ नेते होते.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली विधानसभेत भाजप विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवाराने पत्रकार परिषदेत घेत भाजप कार्यकर्ते आपला प्रचार करत असल्याचा दावा केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला दोन दिवस बाकी असताना हिंगोलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

हिंगोली (Hingoli) विधानसभा मतदारसंघात रामदास पाटील सुमठाणकर यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे रामदास पाटील हे भाजपचे वरिष्ठ नेते होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे नाराज झालेल्या रामदास पाटील यांनी भाजप (BJP) विरोधात दंड थोपटत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्थात हिंगोलीत भाजप विरोधात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांच्यात लढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.   

दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना उद्याचा दिवस प्रचाराचा आहे. तर या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाला केवळ दोन दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांनी भाजपचे कार्यकर्ते सोबत असून ते प्रचार करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर भाजप कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र या खळबळजनक दाव्यामुळे भाजपचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांची चिंता वाढली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT