Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : मध्यरात्री नागरिक सतर्क झाले अन् ३५० जणांचा जीव वाचला

Hingoli News मध्यरात्री नागरिक सतर्क झाले अन् ३५० जणांचा जीव वाचला

संदीप नागरे

हिंगोली : पावसाळा सुरू झाला की दरड कोसळणे, भुसक्कलन होणे अश्या नैसर्गिक आपत्ती घडून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटना घडतात, मात्र हिंगोलीच्या वसमत शहरात पालिकेच्या दुर्लक्षाने हजारो नागरिकांच्या जीवावर जी परिस्थिती बेतली ती अंगावर काटा आणणारी आहे. (Tajya Batmya)

धरणामधून पाण्याचा विसर्ग व्हावा, असेच काहीसे चित्र वाटणारा हा पाण्याचा खळखळाट कुठल्या धरणाचा नाही तर वसमत शहराच्या मधोमध असलेल्या पालिकेच्या ताब्यातील फुटलेल्या तलावाचा आहे. वसमत शहराच्या व पालिकेच्या सौंदर्यात नेहमी भर घालणाऱ्या या तलावाचं वसमत पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी नेहमी भरभरून कौतुक करतात. मात्र या तलावाच्या डागडूजीकडे मागच्या अनेक वर्षात कुणीही लक्ष न दिल्याने काल या तलावाला मोठे भगदाड पडले. काल मध्यरात्री या तलावाचा बांध फुटला आणि तलावाच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवितवाला धोका निर्माण झाला. साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात काही तासांमध्ये पाणी घुसले, कुणाचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर कुणाची जनावरे वाहून गेली. 

स्थानिक महसूल प्रशासन व पोलिसांच्या मदतीने तातडीने बाधित कुटुंब, लहान चिमुकले आणि जेष्ठ नागरिकांना जागृत करत सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला. शेकडो नागरिकांना प्रशासनाने सार्वजनिक रुग्णालय व शाळेमध्ये हलवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पण हा तलाव फुटल्यानंतर वेळीच नागरिकांनी सावधगिरी बाळगल्याने व प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या वसमत पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊन आमची घरे व कुटुंब कधी संरक्षित होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

Maharashtra Live News Update: मुरुडजवळ एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

नवरात्रौत्सवाला गाळबोट, दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Bride Skin Care: प्रत्येक नव्या नवरीच्या स्किनकेअर किटमध्ये असायलाच हव्यात या ७ आवश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT