Bus Video Viral : बसचा धक्कादायक व्हिडिओ पुन्हा समोर; चालकाच्या एका हातात स्टेरिंग आणि दुसऱ्या हातात वायपर

MSRTC Bus बसचा धक्कादायक व्हिडिओ पुन्हा समोर; चालकाच्या एका हातात स्टेरिंग आणि दुसऱ्या हातात वायपर
Bus Video Viral
Bus Video ViralSaam tv
Published On

मंगेश बांदेकर 

गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या लालपरीचा व्हिडिओ सध्या राज्यभर तुफान गाजवत असताना याच आगाराच्या एका बसचा (St Bus) नवा व्हिडिओ समोर आला आहे. भर पावसात बसचा वायफर बंद झाल्याने एका हाताने स्टेअरिंग आणि एका हाताने वायफर फिरवण्याची वेळ चालकावर आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे (Aheri) अहेरी आगारातील भंगार बस गाड्यांचा विषय ऐरणीवर आला असून प्रवाशांचा जीव आता टांगणीला लागला आहे. (Latest Marathi News)

Bus Video Viral
Jalgaon News : तीन महिन्यापूर्वी लग्न; घरात कुणी नसताना तरुणाचे टोकाचा पाऊल

राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसचा विषय नेहमीच ऐरणीवर असतो. कालबाह्य झालेल्या बस प्रवाशांना घेऊन रस्त्यावरून धावत असतात. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. अशाच भंगार बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात अशा बसमुळे अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या दरम्यान बसचे छप्पर उडत असलेल्या व्हिडिओनंतर आता चालकाला बसचे वायपर हाताने फिरवावे लागत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Bus Video Viral
Ahmednagar News : सरकारच्या फसव्या दुध दरा विरोधात रास्तारोको; अंगावर दूध ओतून सरकारचा निषेध

बसवर नियंत्रण कसे मिळेल 

अहेरी आगाराची आसरअल्ली बस प्रवाशांना १२० किलोमीटर अहेरीकडे घेऊन येत असताना रात्र झाली. त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र बसचे वायफर काम करत नसल्याने समोरचे काहीही दिसणे (Gadchiroli) चालकाला कठीण झाले. त्यामुळे चालकाने चक्क एका हाताने स्टिअरिंग तर एका हाताने वाइपर फिरवत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com