Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : काही वेळच्या चक्रीवादळाने केळी उत्पादक शेतकरी उध्वस्त; पडलेली बाग पाहून शेतकऱ्याने फोडला टाहो

Hingoli News : राज्यातील अनेक भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मात्र अजूनही मॉन्सून सक्रिय झाला नसल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा अनेक भागांना बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

हिंगोली : महिनाभर अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून थोडे सावरत असताना मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळीवाऱ्याचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.  

राज्यातील अनेक भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मात्र अजूनही मॉन्सून सक्रिय झाला नसल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा अनेक भागांना बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीची झळ सहन करावी लागत आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला असून यात उभ्या असलेल्या केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. 

आज होणार होती केळीची तोडणी 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात केवळ एका तासात आलेल्या वादळी वाऱ्याने शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. आज सकाळी तोडणीला सुरवात होणारी केळीची बाग अवकाळीच्या तडाख्याने उध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी राजू दत्तराव गावंडे यांनी टाहो फोडत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे, 

रस्त्यावर झाड कोसळले वाहतूक कोल मोडली होती
हिंगोलीत रात्री चक्रीवादळाने थैमान घातले आहे. कळमनुरी शहरात मुख्य रस्त्यावर या चक्रीवादळाने रस्त्यावर एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. मुख्य मार्गावर हे झाड आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाला होता. दरम्यान प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने हे झाड बाजूला करत पुन्हा एकदा ही वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. तर अनेक भागात वादळी वाऱ्याने शेतीचे देखील नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT