हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयामध्ये भिंतीला चिकटलेल्या मधमाशांनी दुपारी शासकीय कामकाज सुरू असताना कार्यालयात अचानक हल्ला चढविला. यात तहसिल कार्यालयातील कर्मचारी व आलेले नागरीक (Hingoli News) जखमी झाले आहेत. (hingoli news Bee attack Tehsil office staff Civilian injured one in critical condition)
सेनगाव तहसिल कार्यालयात आलेल्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला करत जखमी केले आहे. अचानक मधमाशांनी हल्ला (Bee Attack) चढविल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तर अनेकजण या मधमाशांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी कार्यालयातील खुर्ची टेबलाचा आसरा घेत बचाव केला.
एकाची प्रकृती अत्यवस्थ
चावा घेणाऱ्या मधमाशा ह्या आग्या मोहोळाच्या असल्याने नागरिक या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत. तर एका नागरिकाची या घटनेमध्ये प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सेनगाव तहसील कार्यालयाने दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सेनगाव येथील रुग्णालय (Hospital) प्रशासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी नागरिक व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. यानंतर सेनगावमधील नागरिकांनी देखील धूराच्या सहाय्याने तहसील कार्यालयातील मधमाशांना पळवून लावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.