Mumbai Saam TV
महाराष्ट्र

Hingoli : हृदयद्रावक! पत्नी जीव द्यायला गेली, नवरा वाचवायला पळाला, विहिरीत बुडून दोघांचाही मृत्यू

Hingoli Local News : हिंगोलीमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. शुल्लक कारणामुळे पत्नी आयुष्य संपवण्यासाठी गेली, वाचवण्यासाठी नवरा धावला. पण दोघांचाही जीव गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Hingoli Local News : हिंगोलीमध्ये पती आणि पत्नीच्या मृत्यूची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने आयुष्य संपवण्यासाठी विहिरीत उडी घेतली, नवरा वाचवण्यासाठी धावला, त्याने उडीही घेतली. पण दोघांचाही अंत झाला. या घटनेमुळे हिंगोलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुल्लक कारणामुळे पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, वाचवण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचाही जीव गेला.

हिंगोलीतील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना विहीरीच्या बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनास्थळावर चौकशी करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींना, शेजाऱ्यांना माहिती विचारली जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत गेलेल्या पतीचाही या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंगोलीतील अकोला बायपास परिसरामध्ये आज सकाळी ११ वाजताच्या आसपास ही धक्कादायक घटना घडली.

या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नी असे दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान रात्री देखील एका पोलीस कर्मचार्‍याने कौटुंबिक वादामधून आपल्या संपूर्ण कुटुंबावर गोळीबार केला होता, या घटनेत देखील पत्नीचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT