Tilache Ladoo : मकर संक्रांतीला बनवा सोप्या पध्दतीचे तीळाचे लाडू, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिळगुळ

तिळगुळ हा मकर संक्रांतीचा खास प्रसाद आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो.

Tilache Laddoo | GOOGLE

साहित्य

पांढरे तीळ , गूळ , वेलची पावडर, तूप , सुके खोबरे किसलेले आणि बदाम काजू काप इ. साहित्य लागते.

Kislele Khobre | GOOGLE

तिळ भाजण्याची पद्धत

एक कढई घ्या. त्या कढईत तीळ मंद आचेवर ठेवून सतत भाजा. तिळाचा सुगंध किंवा हलका सोनेरी रंग आल्यास गॅस बंद करावा. भाजताना तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.

White Till | GOOGLE

गूळ तयार करणे

दुसऱ्या कढईत तूप घालून किसलेला गूळ मंद आचेवर वितळवून घ्यावा. गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर घाला. फार उकळू देऊ नका.

White Till | GOOGLE

तिळ आणि गूळ एकत्र करणे

वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ घालून नीट मिक्स करा. त्यानंतर सुके खोबरे आणि ड्रायफ्रूट्स ही टाका.आता लाडूचे मिश्रण तयार आहे.

Tilgul | GOOGLE

लाडू वळणे

मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू वळायला घ्यावे. हाताला दूध पाणी किंवा तूप लावून छोटे-छोटे लाडू वळा. गरम असतानाच वळणे सोपे जाते.

Tilache Laddoo | GOOGLE

तिळगुळ परफेक्ट होण्यासाठी टिप्स

तिळ मंद आचेवरच नेहमी भाजून घ्या. तसेच गूळ जास्त उकळवून देऊ नका. मिश्रण तयार झाल्यानंतर खूप थंड होण्याआधी गरम गरम लाडू वळून घ्यावे.

Tilache Laddoo | GOOGLE

तिळगुळाचे आरोग्यदायी फायदे

तिळ गरम असल्यामुळे शरीराला उष्णता देतात. तसेच हाडे मजबूत करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.

Tilache Laddoo | GOOGLE

साठवून ठेवणे

तिळगुळ लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास 10 ते 12 दिवस टिकून राहतात.

Tilache Laddoo | GOOGLE

Aloo Kachori Recipe : फक्त 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत आलू कचोरी, वाचा सिंपल पद्धत

Aloo Kachori | GOOGLE
येथे क्लिक करा