ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाचे सरबत हे एक पारंपारिक पेय आहे. हे सरबत फक्त स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी ही फायद्याचे आहे.
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या, साखर, लिंबाचा रस आणि ठंड पाणी इ. साहित्य लागते.
अंदाजानुसार, गुलबाच्या पाकळ्या घ्या. त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि सुकत ठेवा.
गुलबाच्या पाकळ्यांना आता साखरेसोबत मिक्स करा आणि त्याचे जाडसर सिपर तयार करा.
आता तयार केलेल्या सिरपला गाळून घेवून, ठंड करण्यास ठेवा. त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि स्वादानुसार साखर अॅड करा.
या सिरपला तुम्ही स्टोर करुन ठेवू शकता. सिरपमध्ये थंड पाणी टाका आणि सरबत तयार करा.
हे गुलाब सरबत तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे घालून सॉफ्ट ड्रिंक म्हणून सर्व्ह करु शकता.
गुलाब सरबत पचनास मदत करते आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.