ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आले, लसूण, कोथिंबीर, खोबर आणि हिरवी मिरची एकत्र वाटून तयार केलेले वाटण भाजीला चव आणि सुगंध देते.
वाटण करण्यापूर्वी सर्व साहित्य स्वच्छ धुवा आणि कापडावर पसरवून पूर्ण सुकवून घ्या. ओलावा राहिल्यास वाटण लवकर खराब होते.
वाटण करताना जास्त पाणी घालू नका. जास्त पाणी टाकल्यास वाटणाला चव राहत नाही. घट्ट वाटण जास्त काळ टिकते आणि भाजीला चांगली चव देते.
वाटणात थोडे मीठ किंवा १ ते २ चमचे तेल घाला. तेल किंवा मीठ घातल्यास वाटणाचा टिकाऊपणा वाढतो.
वाटण नेहमी स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात ठेवावे. उघड्या भांड्यात ठेवल्यास रंग व चव बदलून वाटण खराब होते.
हे वाटण नेहमी फ्रिजमध्ये ठेवावे. रूम टेंपरेचरला ठेवल्यास १ दिवसात खराब होऊ शकते.
तुम्हाला जेव्हा वाटण हवे असेल तेव्हा ते नेहमी स्वच्छ व कोरडा चमचाने काढावे.ओल्या हाताने वाटण काढल्यास ते खराब होण्याची शक्यता असते.
वाटण १५ ते २० दिवस टिकून ठेवायचे असेल तर, लहान लहान कप्प्यात किंवा आईस ट्रेमध्ये भरून फ्रीझ करावे. गरजेप्रमाणे एक क्यूब वापरता येतो.
फ्रिजमध्ये ठेवल्यास वाटण ४ ते ५ दिवस टिकून राहते. पण जर फ्रीझरमध्ये साठवल्यास १५ ते २० दिवस चांगले राहते.