Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियांचा हैदोस; पाठलाग करणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला; पकडुन ठेवत केली मारहाण

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी वाळू माफिया विरोधात धडक कार्यवाहीची मोहीम उघडली आहे

संदीप नागरे

हिंगोली : वाळू माफियांचा हैदोस कायम पाहण्यास मिळत असतो. कारवाईसाठी जाणाऱ्या पथकावर हल्ला केला जात असतो. त्यानुसार हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा वाळू माफियांची दादागिरी पाहण्यास मिळाली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठीला पकडून डोके फोडले तसेच पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या तलाठीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

वाळू माफियांकडून चोरटी वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. याला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते. तरी देखील वाळूची चोरी सुरूच असल्याचे पाहण्यास मिळते. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी वाळू माफिया विरोधात धडक कार्यवाहीची मोहीम उघडली आहे. 

डंपरचा पाठलाग करत पकडले 

सदर मोहिमेदरम्यान वसमत तहसील कार्यालयातील तलाठी नागनाथ राऊत हे त्यांच्या पथकासोबत वसमत- मालेगाव राज्यमार्गावर गस्त घालत होते. यावेळी टिप्पर मधून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी महसूल पथकासह तलाठी राऊत यांनी वाळूने भरलेला टिप्पर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र टिप्पर चालकाने सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पथकाने डम्परचा पाठलाग सुरु केला. 

वाळू तस्करांचा प्राणघातक हल्ला 

अखेर महसूलच्या पथकाने निळा गावच्या परिसरात डंपरसह चालकाला पकडले. मात्र याच वेळी अचानक वाळू तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करत मारहाण केली. तलाठी राऊत यांना पकडून पट्ट्याने मारहाण केली. यात राऊत गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT