Farmer : पोलिसांची तटबंदी भेदून तुपकर समर्थकांचे समुद्रात आंदोलन; समुद्रात बुडवले सातबारा व सोयाबीन

Buldhana News : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू होत. दरम्यान आज रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात आंदोलन करणार होते
Farmer
FarmerSaam tv
Published On

बुलढाणा : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन उधळून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी प्रयत्न केले. रविकांत तुपकर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांना अटक केली. तरी देखील काही शेतकऱ्यांनी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेला सातबारा तसेच सोयाबीन व कापूस बुडवत आंदोलन करून स्वतःला कर्जमुक्त घोषित केले. 

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू होत. दरम्यान आज रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात आंदोलन करणार होते. या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले होते. मुंबईकडे कूच करण्याआधीच खालापूर येथे ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर काही शेतकऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा भेदून आंदोलन केले आहे. 

Farmer
Sangola News : तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित; सांगोल्यातील करांडवाडीतील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ

कापूस, सोयाबीन, सातबारा बुडविला समुद्रात 
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी (१९ मार्च) दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले. जवा पिकलं तवा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, म्हणत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच कवडी मोल भाव मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले. यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या. 

Farmer
Jalna Crime : दादागिरी वाढली; दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला, पैसे मागत केले वार

अटकेचा केला निषेध 

मुंबईच्या प्रत्येक चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकरांचे क्रांतिकारी शिलेदार अखेर अरबी समुद्रात बोटीद्वारे पोहचले व त्यांनी सोयाबीन व सातबारे फेकून प्रतिकात्मक आंदोलन यशस्वी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान रविकांत तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बळाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com