Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली; हिंगोलीत दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरी

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटींवर लक्ष केले आहे. दोन दिवसापूर्वी हिंगोली शहराच्या जवळ असलेले प्राचीन खटकाळी हनुमान मंदिर चोरट्यांनी मंदिरातील हजारो रुपये असलेली दानपेटी पळवली होती

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हिंगोली शहरातील प्राचीन खटकाळी हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली- वसमत राज्य मार्गावर असलेल्या हनुमान मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सलग मंदिरात चोरी होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटींवर लक्ष केले आहे. दोन दिवसापूर्वी हिंगोली शहराच्या जवळ असलेले प्राचीन खटकाळी हनुमान मंदिर चोरट्यांनी लक्ष करत या मंदिरातील हजारो रुपये असलेली दानपेटी पळवली होती. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झाले होते. मात्र पोलीस चोरीचा तपास करत असताना आज सकाळी पुन्हा एकदा चोरट्यांनी हिंगोली वसमत राज्य मार्गावरील चौकीचा मारुती असलेल्या मंदिरात पुन्हा एकदा दानपेटी फोडली आहे.  

दोन चोरट्यानी लांबविली दानपेटी 

दुचाकीवर आलेले दोन्ही चोरट्यानी आधी मंदिराच्या परिसरात रेकी केली. यानंतर या चोरट्यांनी मंदिराच्या आतमधील लोखंडी चॅनल गेट लोखंडी रॉडने वाकवत आतमध्ये प्रवेश करत चोरी केली आहे. धक्कादायक म्हणजे चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने या चोट्यांचा पाठलाग देखील केला. मात्र चोरटे पसार झाले आहेत. 

पोलिसात गुन्हा दाखल 

हिंगोलीत घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात बाळापुर, सेनगाव, औंढा परिसरात चोरट्यांनी नागरिकांच्या घरांमध्ये चोऱ्या करण्याचे सत्र सुरू ठेवले असताना आता मंदिरातील दानपेट्यांनाही चोरट्यांनी लक्ष केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी चोरट्याचा शोध घ्यावा; अशी मागणी केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT