भाजप अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षाला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण SaamTVNews
महाराष्ट्र

भाजप अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षाला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

कीर्तनादरम्यान छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोलीत भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र महाराज म्हस्के यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून कळमनुरी (Kalamnuri) शहरात मारहाण करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी ही मारहाण केली आहे. महेंद्र महाराज म्हस्के यांनी वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे कीर्तनादरम्यान छत्रपती शिवरायांबद्दल (Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप सतीश पाटील यांनी केला आहे.

हे देखील पहा :

मात्र, हे सर्व आरोप महेंद्र महाराज म्हस्के यांनी फेटाळून लावले असून, जिल्ह्यात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे (BJP Adhyatmik Aaghadi) काम जोमाने करत असल्याने सूड भावनेतून आपल्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हा हल्ला (Attack) कधी करण्यात आला या बाबत अद्याप देखील माहिती मिळाली नाही. (Hingoli attack on BJP adhyatmik aaghadi district president by sambhaji brigade)

मात्र, सोशल मीडियावर (Social Media) मारहाणीचा व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक चौकशी करत असून मारहाण केलेल्या व्यक्तीची तक्रार आल्या नंतर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे संभाजी ब्रिगेड विरुद्ध भाजपा (BJP) वाद रंगण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT