मी रामाला देव मानत नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

तुलसीदास आणि वाल्मिकींना मी मानतो. मात्र, राम देव नव्हता, त्यांना मी मानत नाही, असं वादग्रस्त विधान मांझी यांनी यावेळी केलं.
Jitan Ram Manjhi
Jitan Ram ManjhiSaam Tv

पाटणा: बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करून राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मी तुलसीदास आणि वाल्मिकींना मानतो, पण रामाला मानत नाही. राम कुणी देव नव्हते, ते तुलसीदास आणि वाल्मिकींच्या महाकाव्यातील केवळ एक पात्र होते, असं वादग्रस्त विधान मांझी यांनी केलं आहे. (Jitan Ram Manjhi)

लछुआडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि शबरी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. तुलसीदास आणि वाल्मिकींना मी मानतो. मात्र, राम देव नव्हता, त्यांना मी मानत नाही, असं वादग्रस्त विधान मांझी यांनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त विधान केले. जे ब्राह्मण मांसाहार करतात, दारू पितात, खोटे बोलतात, त्यांच्याकडून पूजाअर्चा करून घेणे पाप आहे. पूजाअर्चा करून कुणी मोठे होत नाही, असंही मांझी म्हणाले.

Jitan Ram Manjhi
"राज ठाकरे महाराष्ट्राचे नवे ओवैसी"; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

जीतनराम मांझी यांनी लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही भाष्य केलं. अतिमागास, आदिवासी आणि मागास प्रवर्ग हेच देशाचे मूळनिवासी आहेत. मोठे लोक बाहेरचे आहेत. ते आपले मूळनिवासी नाहीत. आपल्या देशात गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जातीचे लोक आहेत. धनदांडग्यांची मुलं खासगी शाळेत, तर गरिबांची मुलं सरकारी शाळेत शिक्षण घेतात, असं मांझी म्हणाले. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. (Jitan Ram Manjhi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com