Sangli News : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही या मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातून प्रतिसाद मिळायला सुरवात झाली आहे. खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. (Maharashtra News)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी निर्णायक आंदोलन जाहीर केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्व गावांनी घ्यावा, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी केली. या विनंतीला मान देत खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील ग्रामस्थांनी शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला.
साम टीव्हीशी बाेलताना सामाजिक कार्यकर्ते शंकर माेहिते म्हणाले आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राज्यातील नेते नारायण राणे, रामदास कदम या वाचाळवीरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु आगामी काळात आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.