Hindu organizations protest Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra News : महापुरुषांच्या अवमानाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद; हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलने, पाहा VIDEO

Maharashtra Andolan News : पुणे शहरात घडलेल्या महापुरुषाच्या अवमानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली.

Satish Daud

पुणे शहरात घडलेल्या महापुरुषाच्या अवमानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त आंदोलकांनी नाशिक-पुणे महामार्ग काही काळ रोखून धरला होता. आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय.

मागील काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्या अवमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. समाजकंटकांकडून महापुरुषाचे फोटो तसेच प्रतिमेची विटंबना केली जात आहेत. पुण्यातील हडपसरमध्येही गुरुवारी अशीच घटना घडली. महापुरुषांचा अवमान केल्याचं समोर येताच हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाल्या.

आज शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणी हिंदू संघटनांनी आक्रमक आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनाची धग मुंबई, पुणे, नाशिकसह कोल्हापूर सारख्या प्रमुख शहरात पसरली. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हिंदू संघटनांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरकपड केली.

कोल्हापुरात हिंदूत्ववादी संघटनांचे आंदोलन

हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी हायवे केला जाम केला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील एन्ट्री पॉईंट असणाऱ्या तावडे हॉटेल परिसरातही मोठ्या संखेने आंदोलक हजर होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

पुण्यात हिंदू संघटनांकडून आंदोलन

मुंबईसह, पुणे शहरातही हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुण्यात नवले ब्रिज, गाडीतळ हडपसर, किवळे याठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणाऱ्या आणि सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा' कायदा पारित करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT