Manoj Jarange VIDEO : छगन भुजबळांना दंगली घडवण्याचा नाद लागलाय; मातोरी येथील दडफेकीवरून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Vs Minister Chhagan Bhujbal : मातोरी येथील दगडफेकीच्या घटनेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Manoj Jarange Vs Minister Chhagan Bhujbal
Manoj Jarange Vs Minister Chhagan BhujbalSaam TV
Published On

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांना दंगली घडवून आणण्याचा नादच लागला आहे. राज्यात शांतता राहू द्यायची नाही असा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हा विषय इतका सहज नका, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले, वडीगोद्री येथील आंदोलनकर्त्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी बसवलं होतं. आम्ही ओबीसी बांधवांना अजिबात दोष देत नाही. कारण त्यांना भुजबळ यांनीच नादी लावलं होतं. कारण, त्यांना तिथे दंगल घडवून आणायची होती. वाद घडून आणायचा, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

Manoj Jarange Vs Minister Chhagan Bhujbal
BJP vs NCP : पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला? आम्हाला उघड करायला लावू नका; अमोल मिटकरी यांचा थेट इशारा

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, संघर्ष करायचा पेटवा पिटवी करायची. गोरगरीब अडचणीत आली पाहिजेत. ओबीसी आणि मराठा सुद्धा यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा धंदा आहे, अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली.

मातोरी गावात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेवर बोलताना जरांगे म्हणाले, त्यांनीच सांगितलं असेल आपल्या गाड्या फोडा, दगडं हाणा, मी बरोबर करतो काही चितावणी द्या, त्यामुळे राज्यात दंगली घडवणं हे भुजबळ यांचं स्वप्न आहे. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी समजून घ्यावं. हा विषय खूप गंभीर आहे, असंही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Vs Minister Chhagan Bhujbal
Jalna News : लाठ्या-काठ्यांचा काळ गेला, उगाच गावाची शांतता बिघडवू नका; लक्ष्मण हाके संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com