Kolhapur illegal religious places Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांवर कायदेशीर कारवाई करा; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Latest News:

कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळ बांधण्यात आल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांना टाळ ठोकलं. मात्र महानगरपालिकेने या अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा जाब विचारत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत एकच गोंधळ उडाला. (Latest Marathi News)

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची मागणी

कोल्हापूर शहरानजीकच लक्षतीर्थ वसाहत आहे. या वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या अनधिकृत मदरसा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या केल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांमधून येत होत्या. हीच तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे केली. त्यानंतर अनधिकृत बांधण्यात आलेल्या या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आज बुधवारी सकाळी मोठा पोलीस फाटा घेऊन महानगरपालिकेचे काही अधिकारी लक्षतीर्थ वसाहत इथे जाऊन या अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांची पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना हे मदरसे बंद करण्याच्या सूचना केल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापालिका अधिकाऱ्यांनी या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजले. एवढा मोठा पोलीस फाटा घेऊन अधिकाऱ्यांनी लक्षतीर्थ वसाहतीत जाऊन नेमकं काय केलं? असा जाब महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांना विचारण्यात आला. यावेळी काही अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने एकच गोंधळ उडाला.

महापालिकेने लवकरात लवकर कोल्हापूर शहरातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज केलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT