tiger, chandrapur , vehicles stops , forest department saam tv
महाराष्ट्र

थांबा ! वाघ येताेय..; एन्ट्रीच अशी की महामार्गावरील वाहतूकच थांबली (व्हिडीओ पाहा)

वनविभागाच्या कृतीमुळे प्राणी मित्रांनी पथकाचे काैतुक केले.

संजय तुमराम

चंद्रपूर : लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर काही वेळा वाहनांना थांबविण्यात येते असे चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या प्राण्यासाठी वाहतुक ती ही महामार्गावरील (highway) थांबविल्याचे कधी कानावर आले हाेते का ? हाेय एका वाघासाठी (tiger) चक्क महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात आली हाेती. ही घटना दाेन दिवसांपुर्वी चंद्रपूर (chandrpaur) जिल्ह्यात घडली आहे. (chandrapur latest marathi news)

नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता. रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे वाघाला रस्ता ओलांडताना अडचण निर्माण झाली हाेती. याबाबतची माहिती घटनास्थळावरुन काहींनी वनपथकास दिली. ही माहिती समजताच पथकाने महामार्गावर धाव घेतली.

घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले. या पथकाने दाेन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबल्याने वाघोबाने माेठ्या दिमाखात रस्ता ओलांडला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. हा क्षण काहींनी आपल्या माेबाईलमध्ये चित्रीत केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT