वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी ; कोंबडीने खाद्य खाण्याचा विक्रम मोडला विजय पाटील
महाराष्ट्र

वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी ; कोंबडीने खाद्य खाण्याचा विक्रम मोडला

सांगलीमध्ये वजनाच्या दुप्पट अन्न खाणारी कोंबडी आहे. हि खादाडी कोंबडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : वाचून आश्चर्य होईल पण हे सत्य आहे. सांगलीमध्ये वजनाच्या दुप्पट अन्न खाणारी कोंबडी आहे. हि खादाडी कोंबडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जगण्यासाठी अन्न खावं असं म्हटलं जातं. मात्र ही कोंबडी जणू काही खाण्या साठीच जगत आहे असं दिसत आहे. सांगलीच्या आटपाडी मध्ये एका पोल्ट्री फार्म वर ही कोंबडी राहत आहे. Hen breaks the record of eating food

हे देखील पहा -

आटपाडीच्या शेटफळे गावामध्ये अशोक पवार यांच्या पोल्ट्री फार्म वर बॉयलर जातीच्या कोंबड्या आहेत. या कोंबड्या पैकी एक कोंबडी दिवसभर नुसतं खाद्य खात असते. आज या कोंबडीचे वय 76 दिवसाचे आहे. ही कोंबडी दररोज किमान अर्धा किलो हून जास्त खाद्य खाते, म्हणजे जवळपास 10 कोंबड्यांचे खाद्य ही कोंबडी एकटीच खात आहे !

कोंबडीला चालताना तिने खाल्लेल्या खाद्यामुळे नीट चालता सुद्धा येत नाही. तरी सुद्धा ही कोंबडी दिवसभर खाद्य खाण्यातच व्यस्त असते. आता आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाऊन ही कोंबडी विश्वविक्रम तर करणार नाही ना असं वाटायला लागलंय. पवार यांनी जगण्याचं साधन म्हणून पंधरा वर्षांपूर्वी पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. पोल्ट्री व्यवसाय करत असताना अनेक वेगवेगळे अनुभव त्यांना आले. त्यामध्ये एकदा तीन पायाची कोंबडी त्यांच्याकडे होती.

कोरोना महामारी असल्याने नवीन पिल्ले भरावी की नको या विचारात पवार होते. परंतु त्यांनी धाडसाने कोंबड्यांची पिल्ले विकत आणून पुन्हा पोल्ट्री सुरू केली. बघता-बघता हि लहान पिल्ले मोठी होऊ लागली. त्यामध्ये एक कोंबडी अशी निघाली की तिच्या वजनापेक्षा जास्त खाद्य खात आहे. अनेक जण हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या कोंबडीला चालता सुद्धा येत नाही तरीसुद्धा दिवसाला अर्ध्या किलोपेक्षा जास्त खाद्य खात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

SCROLL FOR NEXT