helmet, maharashtra saam tv
महाराष्ट्र

Helmet Compulsion : सर्व सरकारी कार्यालयात हेल्मेट सक्ती; RTO ची स्वत:च्या कार्यालायापासून अंमलबजावणी

सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना हेल्मेट घालूनच यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सुशिल थोरात

Nagar RTO : नगरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नगर (Nagar) शहरातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये आता हेल्मेट सक्तीचा (Helmet Compulsion) आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी खूद्द प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

इतर सरकारी कार्यालयाच्या विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठवून हेल्मेट सक्ती बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना हेल्मेट घालूनच यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार नगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी हेल्मेट सक्ती बाबतचे आदेश काढले. विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांना हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (rto) अधिकारी विविध शासकीय ऑफिसमध्ये जाऊन हेल्मेट सक्ती बाबत पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणी विना हेल्मेट आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आत मध्ये प्रवेश करण्याआधीच हेल्मेट सक्ती बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात विना हेल्मेट (helmet) दिसल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून हजारो रुपयांचा दंड आत्तापर्यंत वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हळूहळू नागरिकांनाही (citizens) या हेल्मेटची सवय लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हा उपक्रम राबवत असल्याचं उर्मिला पवार यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT