Good News : डॉक्टरांना सॅल्यूट! ६व्या महिन्यांत बाळंतपण, बाळाचं वजन अवघं ५०० ग्रॅम; डॉक्टरांमुळं बाळ अन् आई ठणठणीत

कर्नाटकातील दांपत्याच्या आनंद गगनात मावेनासा झाला.
latur, couple, kid, doctor, udgir
latur, couple, kid, doctor, udgirsaam tv

Positive Vibes : विवाहनंतर (marriage) सहावर्षांनी तिला गर्भधारणा झाली परंतु नऊ महिने पुर्ण हाेण्यापुर्वीच सहाव्या महिन्यात आईच्या तब्येतीमुळं डॉक्टरांना बाळंतपण करावे लागले. जन्मतः केवळ ५०० ग्रॅम वजन असलेल्या बाळ सुरक्षित ठेवण्याची कसरत डाॅक्टरांनी (doctor) यशस्वी केली आणि सहा वर्ष अपत्याची वाट पाहणा-या दांपत्याच्या (couple) जीवनात आनंद भरला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे नुकतीच ही आनंददायी घटना घडली. (Latur Latest Marathi News)

latur, couple, kid, doctor, udgir
Positive News : रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; साेन्याचे दागिने केले परत, युवती खूष

कर्नाटक (karnataka) येथील कमलनगर तालुक्यातील नागमणी अडदाणे यांच्या लग्नाला सहा वर्ष झाले. घरात पाळणा हलला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आणि तणावात असायचे.

latur, couple, kid, doctor, udgir
Positive News : भांडी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, साेन्याचे मंगळसूत्र परत केले

तब्बल सहा वर्षानंतर नागमणीला दिवस गेले. अडदाणे परिवारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मात्र हा आनंद केवळ सहा महिन्यांचाच होता. सहाव्या महिन्यात आई अन बाळाची प्रकृती बिघडली. दोघंही धोक्यात होते. बालराेग तज्ञ डॉ. पंकज मुंडे (dr. pankaj munde) यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत अवघ्या सहाव्या महिन्यात नवजात बालकाला धोका असतानाही बाहेर काढलं.

याबाबत बाळाची आई नागमणी अडदाणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना आम्हांला खूप आनंद झाल्याचे सांगितले. जे बाळ हातात घेणं कठीण आहे त्या बाळाला वाचवून त्याला योग्य उपचार देऊन फक्त ७० दिवसांत त्या बाळाचं वजन १३०० ग्रॅम पर्यंत वाढवणं ही मोठी किमया डाॅक्टरांनी केल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर हाेता. (Maharashtra News)

latur, couple, kid, doctor, udgir
Pandharpur : माघी यात्रेसाठी पंढरपुर सज्ज; विठ्ठल मंदिर सजले, पाेलिस यंत्रणा सतर्क

दरम्यान यापुर्वी अशा किचकट गाेष्टी महानगरांमध्ये पाठवल्या जात असे. परंतु उदगीर येथील ही घटना लातूर (latur) जिल्ह्यातील आणि कदाचित राज्यातली (maharashtra) पहिलीच घटना असावी अशी चर्चा देखील आहे. सहाव्या महिन्यांत जन्मलेलं मूल आणि आई दोघंही ठणठणीत असून त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com