Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update : परतीचा पाऊस झोडपणार! रायगड, पुण्याला कोसळधारेचा अंदाज, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि इतर जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Alisha Khedekar

  • रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट; वादळी पावसाचा अंदाज

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पावसाचा जोर

  • विदर्भ-कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी, तापमानात चढउतार

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुन्हा एकदा जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस होण्याचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले आहेत. या प्रणालीमुळे या भागात कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून ते पुढील २४ तासांत जमिनीवर सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून, रोहतक, सोहनी, राजनंदगाव मार्गे कमी दाबाच्या केंद्रापर्यंत सक्रीय आहे.

उपसागरातील कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेत उष्ण-आर्द्रतेचा पट्टा पसरला आहे. यामुळे राज्यभर पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, वायव्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली असून, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे तब्बल १६० मिलिमीटर तर पालम येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, पावसामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत.

आज रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर असल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाची गती वाढलेली दिसत आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या काही दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय राहील. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT