Torrential rains disrupt life in Maharashtra; CM Devendra Fadnavis reviews flood situation saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Heavy Rains Lash Maharashtra: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मुंबई आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, कोकण व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट.

  • प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचे आवाहन.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्यभरात धुव्वाधार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जातंय. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारील राज्यांशी संपर्क साधलाय.

नांदेडमध्ये खूप पाऊस पडलाय, तेथे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झालीय. एनडीआरएफ आणि लष्कराच्या तुकड्या तिथे पोहोचल्या आहेत. राज्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्ग करावा लागला तर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात दयनीय स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस शेजारील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पण, विश्रांतीनंतर अचानक इतका पाऊस का पडतोय? असा प्रश्न केला जातोय.

महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतोय?

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरूय. काही भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलाय. त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झालाय. पूर्व-पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होतोय.

पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केलाय. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठी देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड या सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT