बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान!

गेवराई राहेरी, तलवाडा रोहितळ, राजापुर येथील नदीला पुर आल्याने गावातील शाळेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी !

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात काल रात्रीत 75.2 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर नद्यांसह, ओढे, बंधारे ओव्हरफ्लो झाल्यानं पिकांमध्ये पाणीचं पाणी झालं आहे. उभी पिकं आडवी झाली असून गेवराई तालुक्यातील रोहितळ, राजापुर, राहेरी,तलवडा येथे नदीला पुर आल्यानं अनेक गावाचा संपर्क तुटला होता. तर रोहितळ गावांमध्ये सकल भागात पाणी शिरले आहे.

नदीकाठच्या काही घरांसहीत शाळा परिसरात देखील पाणी भरलंय. त्याचबरोबर बीड, वडवणी, माजलगाव, परळी, केज, धारूर यासह सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT