Rain: 'या' जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ Saam Tv
महाराष्ट्र

Rain: 'या' जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने Heavy Rain काही जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनजीवन पुन्हा नीट रुळावर येत असतांना हवामान विभागाने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली आहे. यलो अलर्ट Yellow Alert यात पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर सोबतच सहा जिल्ह्यांना देण्यात आला आहे. तर जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील काही दिवसात मुसळधार पाऊस राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत झाला आहे. महाराष्टातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानं पूराचं पाणी ओसरत आहे आणि हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आज ता.27 जुलै आणि उद्या ता. 28 जुलै रोजी पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

29 आणि 30 जुलैला रोजी ऑरेंज अलर्ट:

पुढील 48 तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 29 आणि 30 जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या बाबत जिल्ह्यांना इशारा दिला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT