Heavy rainfall Alert  saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने उसंत घेतली आहे, पण...

साम टिव्ही ब्युरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे वादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची (heavy Rainfall) शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातली पावसाचा जोर वाढेल,असा अंदाज हवामान विभाग (IMD Alert) वर्तविला आहे. तसेच विदर्भ, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी (ता.२०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड व छत्तीसगडकडे मार्गस्थ होऊत,तेथे जोरदार पाऊस पडेल.पुढील आठवड्याच्या शेवटी मॉन्सूनचा आसही मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात उघडीप होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

- नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस

- घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी परिसरात जोरदार पाऊस कायम

- मंगळवार (ता.२३) पासून पावसाचा जोर कमी असेल. मात्र या काळातही तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT