Gadchiroli Rain 
महाराष्ट्र

Gadchiroli Rain: गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, 120 गावांचा तुटला संपर्क

Gadchiroli Rain: गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने ४८ तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३ मोठे मार्ग तर १० लहान मार्ग असे एकूण १३ मार्ग वाहतूकसाठी बंद झालेत.

Bharat Jadhav

मंगेश भांडेकर, साम प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात वरुणराजा धुव्वाधार बॅटिंग करत आहे. गडचिरोली जिल्ह्यात कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आलाय. यामुळे १४ मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय . तर भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटलाय.

Gadchiroli Rain

गेल्या २४ तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. कुरखेडा तालुक्यात ११६.६ मिलिमीटर पाऊस पडला. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणीवाहू लागल्यांने तेथे बरिकेट लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली अहेरी-मोयाबीनपेठा, कुरखेडा-चारभट्टी, आलापल्ली-सिरोंचा, जारावंडी ते पाखांजूर, पोर्ला-वडथा, वैरागड-शंकरपूर, कुरखेडा-वैरागड, कारवाफा-पोटेगाव, मालेवाड़ा-खोब्रामेंढा, गोठणगाव-सोनसरी, देसाईगंज-आंधळी, लखमापूर बरी-गणपूर या १४ मागवरील वाहतूक ठप्प झालीय.

Gadchiroli Rain

गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हे धरण तुडुंब भरलंय. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून २९७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूय. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT